शिरूर : पर्यटन दुष्ट्या राज्यांत अनेक धार्मिक व इतिहासिक स्थळे असुन राज्य सरकारने केंद्राची मदत घेऊन ग्रामिण पर्यटनावर भर दिल्यास पर्यटन वाढून ग्रामिण भागातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल अशी प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले .
टाकळी हाजी ता शिरूर व निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे या ठिकाणाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली .यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव माऊली सलगर, रासपाचे युवक अध्यक्ष अजित पाटील, युवानेते राजेंद्र गावडे, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, गोरक्षनाथ ईरोळे, देविदास पवार, विलास रोहीले, अतुल मुंजाळ, संकेत घोडे उपस्थित होते .
महादेव जानकर म्हणाले की ,पुणे व अहिल्यानगर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेले जगप्रसिद्ध रांजणखळग्यांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून भूगोल तज्ञ तसेच मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत .शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे .देशाला लाभलेला हा अप्रतिम असा खजिना असून अशा ठिकाणांच्या संवर्धनासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे .
महाराष्ट्र राज्याला पर्यटन क्षेत्रात मोठा भाव असून अनेक धार्मिक व ऐतिहासिक गड किल्ले राजवाडे नदी घाट बारवा यांचा अमोल ठेवा जतन करणे गरजेचे आहे .
शासनाने ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रत्येक गावातील ऐतिहासिक ठेवा जतन करीत त्याच्या विकासाला निधी देण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली .
ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र गावडे यांनी जानकर यांचा सत्कार केला .
गोरक्षनाथ ईरोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले