शिरुर ( वृत्तसेवा ) शिरूर जि पुणे येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील मराठी विषयाच्या अध्यापिका प्रा. क्रांती हरेश पैठणकर ( गोसावी ) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी.ची पदवी प्राप्त झाली आहे .
डॉ. प्रा .क्रांती पैठणकर यांनी पीएच.डी. साठी ” निवडक सामाजिक कार्यकर्त्या स्त्रियांची आत्मचरित्रे : एक अभ्यास ” या विषयावर प्रबंध सादर केला . या प्रबंधासाठी त्यांना प्रा .डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी मार्गदर्शन केले . प्रा. डॉ. क्रांती पैठणकर या अनेक वर्षापासून बोरा महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करीत असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम. ए .ला सुवर्णपदक प्राप्त केले होते . याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शिरुरच्या त्या कार्याध्यक्षा असून शहरातील सामाजिक ,साहित्यिक ,सांस्कृतिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. प्रा. क्रांती पैठणकर यांना पीएच.डी .पदवी प्राप्त झाल्याबद्दल शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा , सचिव नंदकुमार निकम , महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल , प्राचार्य डॉ . के . सी मोहिते, बोरा महाविद्यालयातील मराठी विषयाचे विभाग प्रमुख डॉ . बाळकृष्ण लळीत , माजी प्राचार्य डॉ. सीताराम गोसावी , उपप्राचार्या डॉ . सीमा गोसावी ,साहित्य परिषद शाखा शिरुरचे अध्यक्ष नीलेश खाबिया आदीनी अभिनंदन केले आहे .