शिरूर (वृत्तसेवा ) : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आण्णापुर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शिरूर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आयोजकांसह गौतमी पाटीलवर आली मात्र, त्या ऐवजी गौतमी पाटील हीची सहकारी हिंदवी पाटील हिने गौतमीच्याच उपस्थितीमधे कार्यक्रम सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली .
आण्णापुर येथे हनुमान जयंती निमित्त गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दोन बाहेर गावच्या महिलांनी या कार्यक्रमाबाबत शिरूर पोलिस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला . त्यामुळे शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांवर आणि गौतमी पाटील चा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली.
यावेळी कार्यक्रम स्थळी गौतमी पाटील येऊनही तीने परफॉर्मल केला नाही ,या वेळी आयोजकांनी गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटील च्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे गौतमीला भारी हिंदवी अशीच चर्चा परिसरात रंगली. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समजले आहे.
गौतमी पाटील हिने यावेळी कार्यक्रम स्थळी हजेरी लावून प्रेक्षकांशी संवाद साधला आणि आपल्याला डान्स न करता आल्यामुळे तिने दिलगिरी देखील व्यक्त केली. मी आज आण्णापुरची मुलगी म्हणून इथे आले असून ,मी काही कारणामुळे कार्यक्रम करू शकत नाही, मात्र पुढच्या वेळी नक्की मी डान्स करेल असे आश्वासन देखील गौतमी पाटील हिने प्रेक्षकांना दिले. मात्र जिल्ह्यात चाकण येथे परवानगी दिली आहे, तसेच तालुक्यात इतरही ठिकानी परवानगी देण्यात येते मग आमच्याच कार्यक्रमाला परवानगी का नाकारली असा सवाल सरपंच किरण झंजाड यांनी व्यक्त करीत पोलिस खात्यांच्या कार्यपद्धती वर नाराजी व्यक्त केली आहे .