कृषीक्रीडापुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणशैक्षणिकसामाजिक

वैदयकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारा मुळे टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य सेवेतचे तीन तेरा .

नावाजलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला लागली घरघर

टाकळी हाजी ( प्रतिनिधी ) : टाकळी हाजी ता शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने आरोग्य सेवेचा खेळ खंडोबा झाला असुन सर्व सामान्य माणसांला उपचारासाठी खाजगी दवाखाण्यात धाव घ्यावा लागत आहे .
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास १२ गावे अंतर्भूत असून ४ ठिकाणी उपकेंद्रे सुरू आहेत. यामधे जांबुत पिंपरखेड सारख्या मोठ्या गावाचा समावेश आहे . येथे वैदयकीय अधिकारी म्हणुन उत्तम सेवा देणारे वैदयकीय अधिकारी प्रदीप बिक्कड यांची बदली झाली . ते या ठिकानी कायम स्वरूपी राहात होते, त्यामुळे २४ तास जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध होत होती . मात्र त्यांच्या बदली नंतर एका महीला वैदयकीय अधिकारी येथे रुजु झाल्या मात्र त्या कधीच येथे न राहाता शिरूर वरून येजा करीत आहेत . या बाबत त्यांना वेळोवेळी ग्रामस्थांनी येथे थांबण्याच्या सुचना दिल्या मात्र त्या कोणाचेच ऐकत नाहीत . तसेच तक्रार करणाऱ्यांना उर्मटपणे बोलत आहेत . या बाबतचा अनुभव अनेक लोकप्रतिनिधीना सुद्धा आला आहे . त्यामुळे रुग्नांना वेळेत सेवा मिळत नाही तसेच मोठ्या प्रमाने प्रसुती साठी येणाऱ्या महीलांची प्रसुती न करता दुसऱ्या दवाखाण्यात पाठविले जात आहे . त्यामुळे या दवाखान्यात पुर्वी ८ ते १० प्रसुती दरमहा होत होत्या आता हि संख्या घटुन मागिल महीन्यात एकच प्रसुती झाली तीही आरोग्य सेविकामुळे झाल्याची चर्चा आहे .

मात्र येथील वैद्यकीय अधिकारी त्यांच्या कामात दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून उमटत आहेत. या अधिकाऱ्यांची त्वरित बदली व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या बाबत सरपंच अरुणा घोडे यांनी गटविकास अधिकारी शिरूर यांना पत्र दिले आहे .

वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने अनेकदा रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांना खाजगी दवाखाना किंवा शिरूर, मंचर अशा ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. अनेक वेळा गरोदर महिलांना प्रसूतीसाठी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे पर्यायी मार्ग निवडावा लागत आहे. निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे एका महिलेची रात्रीच्या वेळी पुढील प्रवासातच प्रसूती झाली. जर निवासी डॉक्टर हजर असते तर त्या महिलेची गैरसोय टळली असती.

साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे खाजगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. सामान्य जनतेच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना परिस्थितीमुळे उपचारविना आजारांशी सामना करण्याची वेळ आली आहे.

वैदयकीय अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवास्थानात राहात नसल्या बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असुन त्यांची गंभीर दखल घेत सुचना देण्यात आल्या आहेत . आरोग्य सेवेबाबत कोणतेही हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल .
डॉ रामचंद्र हांकारे ( जिल्हा वैदयकीय अधिकारी ) जि प

वैदयकीय अधिकार्यांना नोटीस देण्यात आली असुन या बाबत योग्य ती कारवाई करू –
दामोधर मोरे ( तालुका वैदयकीय अधिकारी )

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page