कृषीपुणे जिल्हामहाराष्ट्र

शिरूर तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नानासाहेब फुलसुंदर यांची बिनविरोध निवड

शिरूर येथे संपन्न झाली बैठक, फुलसुंदर यांचे विविध स्तरातून अभिनंदन

शिरूर, ता. २२ जुलै: शिरूर तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी नानासाहेब फुलसुंदर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सदस्यांच्या एकमुखी समर्थनाने ही निवडणूक पार पडली.

उपाध्यक्षपदी बापुशेठ मांढरे आणि माऊली शेठ शिंदे, खजिनदारपदी गणेश जगताप, कार्याध्यक्षपदी संतोष शेलार, सचिवपदी नरेंद्र शेठ गायकवाड आणि सह सचिवपदी गणेश धुमाळ यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या संचालक मंडळात पुढील सदस्यांचा समावेश आहे: बाळासाहेब पवार, राजाराम फलके, गणेश रामदास जगताप, महेंद्र कोरेकर, अविनाश भोंडवे, सुनील दाते, प्रभाकर रणदिवे, दत्ता कांदलकर, निलेश कोठारी, राजेंद्र चव्हाण, तुषार होळकर, दर्शन धुमाळ, प्रवीण खेडेकर, विक्रम इचके आणि प्रकाश ननवरे.

निवडीनंतर बोलताना अध्यक्ष नानासाहेब फुलसुंदर म्हणाले, “शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे आणि अत्यावश्यक कृषी सामग्री कमीत कमी किमतीत व योग्य बाजारभावात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संघटनेतर्फे केला जाईल. शिरूर तालुक्यातील शेतीला आधुनिकतेची आणि उत्पादनक्षमतेची जोड देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.”

या निवडीमुळे शेतकरी आणि अ‍ॅग्रो डिलर्स यांच्यात समन्वय वाढून आधुनिक शेतीला गती मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.  फुलसुंदर यांचे खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह सामाजिक राजकीय नेत्यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या .

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page