कृषीपुणेमहाराष्ट्रमुंबई

टाकळी हाजी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ! शेतकरी, महिला व

शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

टाकळी हाजी, ता. शिररूर जि पुणे  : टाकळी हाजी व परिसरात बिबट्यांचे हल्ले थांबता थांबत नाहीत. रोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी रात्री उचाळेवस्ती येथील समाबाई कांदळकर यांच्या घरापर्यंत बिबट्या मांजरीच्या मागे लागून गेला. क्षणार्धात दरवाजा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा बिबट्याने थेट घरात घुसून हल्ला केला असता. पिंपरखेड येथे शेतात काम करणाऱ्या महिलेलाही गेल्या आठवड्यात बिबट्याने झडप घातली होती. दुडेवाडी येथे चार दिवसांपूर्वी शेळीवर हल्ला करून ती ठार केली.

खरिपातील बाजरी काढणी व उसातील कामे सुरू असतानाच बिबट्यांची भीती टांगती तलवार बनली आहे. महिला शेतकरी एकट्याने शेतात जाण्यास घाबरत असून, मुलांना शाळेत पाठवतानाही पालक हादरले आहेत.

वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले तरी बिबटे त्यात अडकत नाहीत. फिरत्या वाहनातून प्रबोधन केले जात असले तरी हल्ल्यांचा धोका वाढतच चालला आहे.


🚨 शेतकऱ्यांची ठाम मागणी

“बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. बिबट्यांची नसबंदी, तसेच मनरेगा अंतर्गत घर व शेतीसाठी संरक्षण कुंपण योजना तातडीने सुरू करावी. अन्यथा शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य होईल.”
– राजेंद्र गावडे (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस)

 

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page