पुणेपुणे जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रराजकारण
कवठे येमाईत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांची उत्स्फूर्त गर्दी
आपल्या सुखदुःखात उभे राहात भागात विकास गंगा आणणाऱ्या गावडे कुंटुबियांना साथ दया : प्रदीपदादा वळसे पाटील यांचे आवाहन

विलास रोहीले
कवठे येमाई (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कवठे यमाई येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीनाना मळेगावकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील चार ते पाच हजार महिला व तरुणांनी उपस्थित राहत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक स्कुटी गांजेवाडी येथील श्वेता भरत गायकवाड यांना मिळाले. अत्यंत गरीब परिस्थितीत असलेल्या श्वेता गायकवाड यांना स्कुटीचे बक्षीस जाहीर होताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस फ्रिज टाकळी हाजी येथील भाग्यश्री रामदास गावडे, तृतीय क्रमांकाचे एलईडी टीव्ही कवठे यमाई येथील लता राहुल पोकळे, चतुर्थ क्रमांकाचे कुलर सुजाता राहुल वाळुंज, तर पाचवा क्रमांक मिक्सर अर्चना संदीप वाळुंज यांना देण्यात आला.
याशिवाय लकी ड्रॉ पद्धतीने असंख्य पैठणी, दोन सोन्याच्या नथ तसेच शेकडो आकर्षक गिफ्ट बॉक्स महिलांना देण्यात आले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना पैठणी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण अभिनेत्री तनुश्री पुणेकर यांनी महिलांसोबत सादर केलेले नृत्य व अदाकारी ठरले. तसेच क्रांतीनाना मळेगावकर यांनी “राष्ट्रवादी पुन्हा…” हे गीत सादर करताच महिलांनी ठेका धरत जल्लोष केला.
हा कार्यक्रम कवठे यमाई येथील कांचनताई राजेश भैय्या सांडभोर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राजेंद्रदादा गावडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. महिलांसाठी स्नेहभोजन, हळदी-कुंकू समारंभ तसेच ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, शिरूर-आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा शुभांगी पडवळ, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम इचके, जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजेश सांडभोर, माजी सरपंच दीपक रत्नपारखी, माजी सरपंच अरुण मुंजाळ, चेअरमन पांडुरंग मुंजाळ, बाजीराव उघडे, दत्तात्रय सांडभोर, कैलास बच्चे, निलेश पोकळे, भरत भोर, रवि गायकवाड, अंकुश शिंदे, नवनाथ वागदरे, नवनाथ सांडभोर, सुनील वागदरे, राहुल सांडभोर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राजेंद्रदादा गावडे व गटाचे अध्यक्ष राजेंद्रभैय्या सांडभोर यांचे महिलांनी कौतुक केले .



