पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणशैक्षणिकसामाजिक

शिरुर तालुक्याच्या राजकीय विद्यापीठाची फडणवीसांनाही भुरळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस , पोपटराव गावडे भेटीने जुन्या आठवणींना उजाळा

टाकळी हाजी : शिरुर ( पुणे ) तालुक्याच्या राजकारणातील विद्यापीठ अशी ओळख असलेले माजी आमदार पोपटराव गावडे तब्बल 62 वर्षापासून जिल्हाच्या राजकारणात सक्रिय आहेत! यशवंतराव चव्हाण साहेबां पासून विद्यमान मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस या सर्वांची राजवट गावडे साहेबांनी जवळून अनुभवली ! अनेक राजकीय घडामोडींचे साक्षीदार असलेले पोपटराव गावडे म्हणजे प्रचलित राजकारणातील चालते- बोलते विद्यापीठच होय!

आता हेच पाहा ना! कोपर्डी येथील दुदैवी निर्भयाच्या बहिणीच्या विवाहा निमित्ताने मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस माजी आमदार पोपटराव गावडे यांची जन्मभुमी असलेल्या टाकळी हाजी गावात आले…राज्याच्या समाजजीवनात खळबळ उडवून देणाऱ्या कोपर्डीच्या दुदैवी घटने नंतर संवेदनाशील मनाच्या फडणवीस साहेबांनी पिडीत कुटुंबाशी सातत्याने संवाद ठेवला निर्धारीत वेळेत आरोपी गजाआड करुन कायदेशीर प्रक्रिया सुरु केली…ही घटना घडली त्या काळात राज्याचे नेतृत्व देवेनभाऊ करत होते संपुर्ण राज्यात अंदोलनाचे लोण पोचले होते..समाजमाध्यमा पासून राजकीय स्तरावर ही फडणवीस यांच्या वर विविध प्रकारचे द्वेष आरोपांची राळ उठवली जात होती …माञ या सर्व प्रसंगाचा ध्यर्याने सामना करत फडणवीस यांनी कणखर प्रशासक कसा असावा याचा वस्तूपाठ राज्याला दाखवून दिला …कोपर्डीच्या दुदैवी निर्भयाच्या कुटुंबातील प्रत्येक घटकाशी मागील तब्बल आठ वर्षापासून सातत्याने संवाद ठेवून संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला .
विवाह निमित्ताने टाकळी हाजी येथे आलेल्या फडणवीस यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या बरोबर दिलखुलास गप्पा मारल्या…शिरुर तालुक्या पासून राज्याच्या राजकारणातील बदलत गेलेले संदर्भ जाणून घेत विद्यमान विधान सभेतील नव्याने आकाराला आलेले सामाजिक समिकरणे, त्याचा महायुतीला झालेला फायदा विशेषतः ओबीसी जातसमुहाने फडणवीस यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास या सारख्या असंख्य मुद्दा वर दोन्ही नेत्या मध्ये मनमुराद चर्चा झाली…माजी आमदार पोपटराव गावडे यांची तब्बल 62 वर्षाची सार्वजनिक जीवनातील वाटचाल , ही अतिशय प्रेरणादाई असल्याचे कौतुक उदगार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले ..मुख्यमंत्री फडणवीस व पोपटराव गावडे यांनी काही काळ विधानसभेत एकञ काम केले आहे . त्याही काळातील जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला..व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढून मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाकळी हाजी येथील गावडे हवेली मध्ये चहापान स्विकारुन आजही पोपटराव गावडे यांचे महाराष्ट्र च्या राजकारणातील स्थान आधोरेखित केले हे माञ नक्की .

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page