शिरूर: ( प्रतिनिधी : म्हसे ता शिरूर जि पुणे येथे बिबट्यांने महिलेवर हल्ला केल्यांने महीला नशिब बलवत्तर म्हणुन वाचली असुन, वन विभागाला वेळोवेळी मागणी करूनही पिंजरे लावले जात नसल्यांने येथील ग्रामस्थ बिबट्यांच्या दहशतीखाली जगत आहे . परंतु वन विभाग तरीही पिंजरा लावण्यास टाळाटाळ करीत असुन माणसं मारल्यावर पिंजरा लावणार आहेत का असा संप्तप्त सवाल म्हसे ग्रामस्थ करीत आहेत .
शनिवारी रात्री ८ .वाजेच्या दरम्यान म्हसे येथे टाकळी हाजी रस्त्यावर राहात असलेल्या तुळसाबाई गंगाराम मुसळे या महिलेवर शेजारी बाजरी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यांने अचानक हल्ला केला . या महीलेने डोक्याला स्कार्प बांधलेला होता त्यामुळे डोक्याला पंजाची जखम झाली मात्र दैव बलवत्तर म्हणुन हि महीला वाचली . या महिलेला तत्काळ शिरूरला ग्रामिण रुग्नालयात उपचारासाठी पाठविण्यात आले . घटना घडल्यानंतर घटनास्थळी तत्काळ घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी धाव घेतली तेथुन वन अधिकारी जगताप यांना फोन करून बिबट्याच्या संरक्षणासाठी परीसरात पिंजरा लावण्यांची मागणी केली आहे . या बाबत येथील ग्रामस्थांनी सांगितले की रोज वस्तीवर बिबट्या दिसत असुन आता पर्यन्त चार पाच शेळ्यां बकरीचा फडश्या पाडला आहे . मात्र संपुर्ण बकरी खाल्यांने त्यांचे अवषेशन सापडल्याने वन विभागाने पंचनामा केला नाही . त्यामुळे नुकसान भरपाई मिळालेली नाही असे मिना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे, पुणे जिल्हा भष्ट्राचारव मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष दत्ता मुसळे,चेअरमन सोनभाऊ मुसळे, चेअरमन रोहीदास मुसळे, बबन मुसळे ,संदीप मुसळे यांनी सांगितले . बिबट्यांचा महिलेवर हल्ला होऊनही वन विभाग पिंजरा लावण्यासाठी दोन दिवस टाळाटाळ करीत असल्याने जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सवाल व्यक्त होत आहे .
घोड व कुकडी नदीच्या काठावरील म्हसे गावासह डोंगरगण शिनगरवाडी, आमदाबाद, निमगाव दुडे ,दुडेवाडी , तामखरवाडी, टेमकरवाडी, वडनेर सरदवाडी माळवाडी जांबुत फाकटे चांडोह पिंपरखेड कवठे येमाई, चांडोह परीसरात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढल्याने बिबट्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे .त्यामुळे मोठ्या प्रमानात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे जांबुत पिंपरखेड येथे वेगवेगळ्या घटनांमधे बिबट्यामुळे चार लोकाना प्राण गमवावा लागला . मात्र त्यानंतरही या परीसरात ना शेतीसाठी विज आली ना बिबट्यासाठी नवीन पिंजरे उपलब्ध झाले त्यामुळे सर्व सामान्य माणसांच्चा जीवाशी वन विभाग खेळत असल्यांची भावना व्यक्त केली जात आहे .
या बाबत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे म्हणाले की ,या परिसरामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पशुदानाबरोबरच मनुष्य प्राण्यावर हल्ले वाढले आहेत , शाळेत येताना ऊसाच्या शेतामधुन रस्ता असुन विध्यार्थ्याना बिबट्यांच्या हल्याची भिती वाटत आहे .त्यामुळे वनविभागाने त्वरित यापरिसरातील गावांमध्ये पिंजरे लावण्यात यावे .