कृषीक्रीडापुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारणसामाजिक
होनेवाडी–टाकळी हाजी परिसरात बैलपोळ्याची धमाल
नृत्यांगनांचे थिरकते पाय, बैलगाडा शौकिनांची हटके मिरवणूक – वातावरण दणाणले!

शिरूर :यंदाच्या बैलपोळ्याचा जल्लोष होनेवाडी–टाकळी हाजी परिसरात अक्षरशः हटके थाटामाटात रंगला. बैलांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकीत यंदा पारंपरिक ढोल-ताशांऐवजी नृत्यांगनांचा ठेका आणि डिजेचा गजर हे मुख्य आकर्षण ठरले.
बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद आणि नृत्यांगनांच्या तालावर थिरकणारी तरुणाई यामुळे वातावरण एकदम रंगतदार झाले. भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल–ताशांचा गजर यामुळे गावोगावी बैलपोळ्याची चर्चा रंगली आहे.
✨ हौसेला मोल नसते…
आधुनिक शेतीत ट्रॅक्टरचा प्रभाव असला, तरीही टाकळी हाजी व परिसरातील काही शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या बैलजोड्यांचे जतन-संवर्धन केले आहे. “हौसेला मोल नसते” याचे प्रत्यंतर देत शेतकऱ्यांनी आपल्या सजवलेल्या बैलांसह उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेतला.
🌟 परंपरा + आधुनिकतेचा मिलाफ
मळगंगा कुंड परिसरात झालेल्या या सोहळ्यात
-
बैलांपुढे नृत्यांगनांचे थिरकणे
-
तरुणाईचा
उत्स्फूर्त सहभाग
-
भंडारा व
आतिषबाजी
अशा तडफदार संगमामुळे परंपरा व आधुनिकतेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला.



